संजय देसाई | सांगली : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाले आहे. म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा अशी अवस्था संजय राऊत यांची झालेली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
संजय राऊत हा पार वेडा झालेला माणूस आहे. त्यांनी आता तरी कुठेतरी थांबायला पाहिजे. अख्या शिवसेनेची राख रांगोळी केल्यानंतर पवारांच्या हातात हात घालून शिवसेना पूर्णपणे संपल्यानंतर सुद्धा हा माणूस आता शांत बसायला तयार नाही. रोज वेगवेगळी स्टेटमेंट करणं विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं निवडणूक आयोगाला अर्वाच्या भाषेत बोलणं. सांगली झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी होते म्हणजे यांची परिस्थिती अशी झालेली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा ही लोक एकमेकांला आता सांभाळून घेत आहेत. ही लोकं आता राज्याचा राहिलं देशाची भाषा बोलायला लागलेली आहेत. खरंतर कुठेतरी सांगलीतल्या कृपामध्ये दवाखान्यात त्यांना भरती करावं, असा घणाघात त्यांनी संजय राऊतांवर केलेला आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे पंतप्रधान पदाचे चेहरा होऊ शकतात. 2024 साठी आपल्याला सर्वसमावेशक आणि सर्वमान्य चेहरा स्वीकरावा लागेल आणि त्यासाठी विरोधी पक्षाने एकत्र येऊन बसणे गरजेचे आहे आणि मला असे वाटते. पुढच्या महिन्यामध्ये संसद सुरु होईल. यावेळी उध्दव ठाकरे दिल्लीत काही दिवस थांबण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय राजकारण करायचे असल्यास दिल्लीत जावे लागते, असे संजय राऊत यांनी लोकशाहीसोबत बोलताना म्हंटले होते.