ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, उद्धवजी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लोकांना बेड व रेमडेसिवर मिळत नव्हतं तेव्हा आपण कुठे होता. माझं परिवार म्हणत एक दिवस तरी बाहेर पडला का? त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले, दोन वेळा त्यांना कोरोना झाला. तरी एकही दिवस ते घरी बसले नाहीत, आम्हीही रस्त्यावर होतो. तुम्ही मोदींना हुकूमशहा म्हणतात हुकूमशाही कशाला म्हणतात ते माहित आहे का? तुमच्या हुकूमशाहीमुळे 55 पैकी आठ-दहा आमदार सुद्धा राहिले नाही. 18 पैकी चार खासदार उरले नाहीत. आमदार आणि मंत्राने तुम्ही भेटला नाही म्हणून लोक तुमच्या सोबत राहिले नाहीत.
तसेच ते पुढे म्हणाले की, तुम्ही खुल्या काँग्रेसमध्ये गेल्याच सांगता जर तुमच्यात हिंमत होती तर निवडणुकांआधी काँग्रेस सोबत जायचं होतं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलात. पंतप्रधानांसंदर्भात बोलताना आपण कुणावर बोलतोय याचं थोडं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. बाहेरील देशांमध्ये गेल्यावर लोक इंडिया मोदीजी असं म्हणतात याच्याबद्दल सर्वांना गर्व वाटायला हवा. त्यामुळे यांच्या बद्दल आता काय बोलावं हेच समजत नाही.