राज्याच्या राजकारणासह देशातही प्रचंड राजकीय खळबळ सध्या माजली आहे. नुकताच काही दिवसापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत रामराम ठोकला. आझाद यांच्या राजीमान्यानंतर देशाचा राजकारणात गोंधळ निर्माण झाला. काँग्रेस सोडल्यानंतर आझाद कोणत्या पक्षात जाणार हा प्रश्न सर्वांना पडल्या. अशातच मोदी यांचे आझाद यांच्याकडून कौतुक करण्यात आल्यामुळे आझाद हे भाजप मध्ये जाणार या चर्चेला उधाण आले. मात्र त्यांनी आता स्वतंत्र पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसला सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद हे पहिल्यांदाच आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची जम्मू- काश्मीरमधील सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळीत्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत केले. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रॅली देखील काढण्यात आली.
गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काश्मीर मध्ये राजकीय भूकंप
गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देतांना आझाद यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री, ८ माजी मंत्री, एक माजी खासदार, ९ आमदार, पंचायत राज संस्थानचे मोठ्या संख्येने सदस्य, जम्मू-काश्मीरमधील नगरपरिषद आणि तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा रामराम ठोकला होता.