एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडली आहे. आमदार, खासदारांसह अनेक शिवसेना (ShivSena) पदाधिकारी तसेच नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची भर पडली आहे. चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आज प्रत्यक्षात खोतकर शिंदे गटात सहभागी झाली आहे.