राजकारण

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत मुंबई उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले होते.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी पक्षप्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपासून संजय पांडे यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरु होती आणि आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय पांडे म्हणाले की, माझी भावना म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करण्याची की, पक्षात प्रवेश करताना मलाही चांगलं वाटतं. आतापासून नाही 2004पासून सुद्धा मी काँग्रेसला जॉईन होण्याच्या तयारीत होतो. मात्र संधी त्यावेळी भेटली नाही. आता संधी आहे, वेळ आहे म्हणून मी जॉईन केलं.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, माझी लढाई कुणाच्या विरोधात नाही. माझे काही मुद्दे आहेत. त्याच्यावर आम्ही लढणार आहे आणि आमच्या पक्षाच्या समर्थनात जे काही मुद्दे असतील तर त्याबाजूने मी लढणार. असे संजय पांडे म्हणाले.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना