Bal Mane  
राजकारण

भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का; भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत असून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असून आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे उदय सामंतांविरोधात बाळ माने यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी; प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी; प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ; घेतला 'हा' मोठा निर्णय

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम