देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत. ग्रँड हयातमध्ये या सर्वांची बैठक पार पडली. 28 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत जमले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, आरजेडीचे नेते लालू यादव आणि त्यांचा मुलगा तेसस्वी यादव, अखिलेश यादव हे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.
या बैठकीत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
समन्वय कमिटीत 13 जणांचा समावेश
शरद पवार
संजय राऊत
केसी वेणूगोपाल
एम के स्टॅलिन
तेजस्वी यादव
अभिषेक बॅनर्जी
राघव चड्डा
मेहबूबा मुफ्ती
डी राजा
ओमर अब्दुला यांच्या समावेश
जावेद खान
ललन सिंग
हेमंत सोरेन