राजकारण

Sanjay Raut: मोदी सरकारला बाळासाहेबांचे विस्मरण?

Published by : Dhanshree Shintre

भारतरत्न पुरस्कारांची घोषणा होताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. यात त्यांनी हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले असे राऊत म्हणाले.

एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, एकाच वर्षात तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार दिले जातात. यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्यासह पाच जणांची भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

निवडणूकांच्या धामधूमीमुळे एका महिन्यात 5 भारतरत्न जाहीर करण्यात आले आहे असे संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण झाले आहे. यावरच संजय राऊत यांना एक्स अकांऊटवर पोस्ट शेअर केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले...आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले...पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!

खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात.मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारत रत्न जाहीर केले... निवडणुकांची धामधूम.दुसरे काय?

कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग.पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्न ने सन्मानित केले....आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत.

पण मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला...ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले...

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?