राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, शिंदे गट आणि शिवसेना याच्यातील वाद आता तीव्र झाला आहे. त्याच दरम्यान शिवसेनेतील पाच आमदार आमच्या शिवसेनेत दाखल होतील, असा खळबळजनक दावा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते शनिवारी (ता. २४ सप्टेंबर) परभणी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा आज परभणीत घेण्यात आला. यावेळी कृषी मंत्री सत्तार यांनी हे विधान केलं. कृषी मंत्री सत्तार म्हणाले की, ‘‘मागील अडीच वर्षांतील बॅकलॉग भरून काढायचा आहे. आता शेवटच्या वर्षात जोरदार बॅटिंग करून विकासकामे सुरू केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामाचा वेग पाहून त्या गटातील अजून पाच आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. काही खासदारही योग्य वेळेची वाट पाहून या गटात सहभागी होणार आहेत.असा दावा त्यांनी बोलताना केला.
परभणी जिल्ह्यात सध्या आमदार, खासदार हे शिवसेनेचे आहेत, अनेक अडचणी होण्याची शक्यता असल्याचे परभणी जिल्हाप्रमुख शिंदे यांनी सांगितले. त्यावरच बोलताना सत्तार म्हणाले की, भाषणाचा धागा पकडत कृषीमंत्री सत्तार यांनी या पुढे घाबरू नका! गोरगरिबांना न्याय देण्याच्या कामात कुणी आडकाठी करीत असेल तर त्याला उत्तर द्या! आपली ताकद दाखवून द्या’, असे खुले आव्हान सत्तार यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले.