राजकारण

एक नव्हे सहाच वर्षाची; सुपुत्राच्या पीएचडीवर किरीट सोमय्यांनी दिले पुराव्यांसहित स्पष्टीकरण

किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना केवळ 14 महिन्यातच पीएचडीची पदवी बहाल केल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु, यावर आता खुद्द किरीट सोमय्यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना केवळ 14 महिन्यातच पीएचडीची पदवी बहाल केल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु, यावर आता खुद्द किरीट सोमय्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. नील सोमय्यांनी एक वर्षात नव्हेतर संपूर्ण सहा वर्षाचा पीएचडीचा कालावधी पूर्ण केला आहे.

नील सोमय्यांच्या पीएचडी पदवीविषयीची माहिती किरीट सोमय्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते म्हणाले की, नील सोमयांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी सहा वर्ष लागले. 17 सष्टेंबर 2016 साली नील यांनी पीएचडीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती. यानंतर 2017 मध्ये सिडनहॅम कॉलेजमध्ये पीएचडीसाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला. व 17 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई विद्यापीठात प्रबंध सादर केला असून 30 सष्टेंबर 2022 रोजी तोंडी परीक्षा (Viva) दिली होती. यानंतर नील सोमय्यांना 1 ऑक्टोबर रोजी पीएचडी पदवीचे प्रमाणपत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बहाल करण्यात आले, असे सोमय्यांनी सांगितले. यासोबत त्यांनी सर्व कागदपत्रेही ट्विट केली आहेत.

काय होता दावा?

नील सोमय्या यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी देण्यात आली होती. परंतु, पीएच.डीच्या प्रमाणपत्रावरील तारखेनुसार विद्यापीठाने नील यांना १४ महिन्यांत पदवी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रमाणपत्रावर १ जानेवारी २०२१ ते १७ ऑगस्ट २०२२ तारखेची नोंद दिसत होती. त्यांच्या प्रमाणपत्राचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, नील सोमय्या यांना विद्यापीठ नियमानुसारच पीएच.डी.ची पदवी प्रदान करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांचे मार्गदर्शक व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी याआधीच दिले होते. तर, मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नील सोमय्या यांचा पीएचडी नोंदणी आणि सबमिशन दरम्यानचा कालावधी नियमांमध्ये आहे. नोंदणीनंतर प्रबंध सबमिट करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी असतो. नील सोमय्या यांनी मार्च 2020 मध्ये त्यांच्या पीएचडी विषयाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, लॉकडाऊनमुळे हा प्रबंध जून 2021 मध्ये स्वीकारण्यात आला.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result