राजकारण

“परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात”, रोहित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Published by : Lokshahi News

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरूनआता पुन्हा राज्यात विद्यार्थ्यांमध्ये तणावाच वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी परीक्षा झाल्यानंतर आता 24 ऑक्टोबरला दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएसी मार्फतच घेण्यात याव्यात, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी.

शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा. अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत गोंधळ झाला असल्यास प्रशासनाने बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी, अशी परखड भूमिका माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी समाजमाध्यमांद्वारे मांडली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result