सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. त्यातच भाजपने जोरदार निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. याच निवडणुकीसाठी भाजपने अनेक राज्यातील महत्वाच्या नेत्यांना गुजरात निवडणुकीची जवाबदारी दिली आहे. महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीची जवाबदारी देण्यात आली आहे. त्यावरूनच आता राज्याचे माजी मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर निघाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळ गुजरात प्रचारात व्यस्त आहे. ओला दुष्काळ आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज बैठकीला एक तास दिला असता तर काय बिघडलं असते. ज्या राज्यात इथले प्रकल्प नेले, तिथे आता मंत्री आणि अख्ख कॅबिनेटच नेलंय. प्रचार करणं आवश्यक आहे. पण महाराष्ट्रासाठी यांनी एक तास तरी काढायला पाहिजे होता. अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली.
दिशा सालियान हिचा मृत्यू प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियानचा तोल गेल्यानं पडून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर काही आरोप करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला या घाणेरड्या राजकारणात पडायचं नाही. मी चिखलात पडणारच नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी केली.