शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला समजणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात आज शिवसेना ठाकरे गटप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागची पाहणी केली. शिवसेनेतील झालेल्या बंडखोरीत औरंगाबादमधून सर्वाधिक आमदार या बंडखोरीत सामील झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.तर धीर सोडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
नुकसानग्रस्त भागात पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचे सुद्धा सांगितले. तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा, अशी कैफियत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली.