राजकारण

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांची जी परखड भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. शिवसेना स्थापनच मराठी माणसाच्या हितासाठी झाली. तीच भूमिका आमचीही आहे. शिवसेना म्हणून राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. राज्यपालांनी खुलासा केला असून त्यांनी अनवधानानं ते विधान केल्याचं म्हटलं आहे. त्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले की, राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. उद्योगाच्या क्षेत्रात मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचं योगदान महत्वाचं आहे. उद्योगाच्या क्षेत्रात मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर आता स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी