devendra fadnavis | eknath shinde team lokshahi
राजकारण

एकनाथ शिंदे आजचं मुंबईत दाखल होणार, सरकार स्थापनेचा करणार दावा

मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु

Published by : Shubham Tate

Devendra Fadnavis Eknath Shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता आठवडा पूर्ण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.आज ईडीने पत्राचाळ आणि पर्ल ग्रुप प्रकरणी संजय राऊत यांना समन्स पाठवला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांचे खाती हटविण्यात आली आहेत. तर शिवसैनिक ठीक ठिकाणी आक्रमक होत आहेत. (Eknath Shinde will arrive in Mumbai today and will claim the formation of the government Devendra Fadnavis)

तर दुसरीकडे कोर्टाच्या याच निर्णायनंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी विजयी ट्विट केलं आहे. हा निर्णय म्हणजे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी विश्वसनीय सूत्रांनी लोकशाहीशी बोलताना एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत काही आमदार येऊन राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. आम्हीच खरी शिवसेना असा दावा या गटातील आमदारांकडून करण्यात येत आहे. शिंदे गटात आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये आमदारांनी हीच भूमिका मांडली आहे.

तर दुसरीकडे, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सर्व पक्षीय बैठकांचा जोर वाढला आहे. मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या बैठकीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळली आहे. प्रसाद लाड, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव