Nana Patole eknath shinde vs shiv sena : आजचा दिवस एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जातोय. महाराष्ट्रातील राजकीय राडा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला असून अवघ्या देशाच्या नजरा महाराष्ट्रावर लागल्या आहेत. कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय. अशातच आता आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन उपाध्यक्षांची बाजू मांडणारे वकील धवन यांनी सांगितलं. (eknath shinde vs shiv sena maharashtra government mva political crisis Nana Patole)
यावर बोलताना काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी मत मांडले आहे. ते म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाला 14 दिवसांची मुदत द्यावीच लागते, मी घाईघाईत प्रतिक्रिया देणार नाही, सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं, ते पाहूनच नंतर सविस्तर बोलेन. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार फार कमी शक्यता ही निलंबनाची कारवाई टळण्यासारखी असते. पक्षांतर विरोधी कायदा एकदम स्पष्ट, आता कुठेही त्यात स्कोप नाही. अपात्रतेमध्ये पक्षाला जास्त महत्त्व आहे, अशी माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या दिवसाच्या सुनावणीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी पहिलीदर प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरांसमोर आता दोनच पर्याय आहेत, एक तर निलंबित व्हा किंवा दुसऱ्या पक्षात जा. तसेच ज्यांना पुन्हा यायचंय, त्यांच्यासाठी अजूनही दरवाजे खुले आहेत. अस मत देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आपल्याच लोकांनी धोका दिला, पण ज्यांना आम्ही विरोधक समजत होतो, ते आज आमच्यासाठी आमच्यासोबत लढत आहेत. तसेच जनतेची कामं अडू नयेत, यासाठी आम्ही खातेबदल केलेला आहे. अशी ही माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली आहे.