Cabinet Meeting | uddhav thackeray | devendra fadnavis team lokshahi
राजकारण

Cabinet Meeting | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास स्वर्गीय दि.बा.पाटीलांचे नाव

पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा, काँग्रेसची कॅबिनेट बैठकीत मागणी

Published by : Shubham Tate

uddhav thackeray Cabinet Meeting : महाराष्ट्रातील सत्ता नाट्य अधिक रंगतदार होत असून यातील महत्त्वाचे सैन्य म्हणजेच एकनाथ शिंदे गट आता गुवाहटीतून बाहेर पडत आहे. दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता (eknath shinde vs shiv sena cm uddhav thackeray mva political crisis bandkhor mla bjp devendra fadnavis)

तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळची आजची बैठक वादळी ठरली. शिवसेनेकडून तीन नामांतराचे प्रस्ताव आणण्याची तयारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मंत्रालयात आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ठाकरे सरकारची आज अखेरची मंत्रिमंडळ बैठक असणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आजच्या मंत्रीमंडळात कोणते निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले. अशातच औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय देण्यात आला आहे. पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा, काँग्रेसची कॅबिनेट बैठकीत मागणी केली आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची काँग्रेसची मागणी मान्य झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहेत. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव आणण्याची शक्यता होती. त्यानुसार ते मांडण्यात आले. उद्धव ठाकरे या बैठकीसाठी मंत्रालयात हजर होते.

शिंदेंचे सहकारी अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा

'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केलं तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल

Influencer इम्शा रहमानचा MMS व्हिडिओ ऑनलाइन लीक, कोण आहे इम्शा?

Mega Block: मुंबईत 16-17 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा