Eknath Shinde and Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

Maharashtra Floor Test : स्थगिती नाही, उद्याच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देखील मतदान करता येणार

Published by : Shubham Tate

eknath shinde governor : ठाकरे सरकारची उद्या बहुमताची परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. उद्याच्या बहुमत चाचणीसाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जात आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज 9 वाजता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. (eknath shinde vs shiv sena cm uddhav thackeray floor test mva political crisis bandkhor mla bjp devendra fadnavis governor)

अपात्र आमदारांना देखील उद्या बहुमत चाचणीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे उद्या ठाकरे सतकारची मोठी परिक्षा होणार आहे. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देखील मतदान करता येणार आहे.

विश्वासदर्शक ठरावाला दिलेल्या आव्हानावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेनेकडून अभिषेक मनुसिंघवी, शिंदेंकडून नीरज कौल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांच्या बाजूने भूमिका मांडली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ३८ आमदार असल्याचे म्हटले होते. मात्र, राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केवळ ३४ आमदारांच्या सह्या आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दोन तृतीयांश म्हणजे ३७ आमदारांचे पाठबळ असणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे तेवढ्या आमदारांचे पाठबळ होते, तर त्यांनी ही बाब राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात का नमूद केली नाही, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे. राज्यात कमालीची अस्थिरता आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांनी इ मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा जावा केला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी विरोधी पक्षाने केली. माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपाल यांनी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी