राजकारण

राष्ट्रवादीला दणका! शिंदेंनी रोखली भुजबळांची 600 कोटींची कामे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. प्रस्तावित कारशेड मुंबई मेट्रो लाइन-3 चा निर्णय बदलल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळांची (Chagan Bhujbal) नियोजित ६०० कोटींची कामे रोखली.

सरकार जाणार हे लक्षात येताच दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा नियोजन कार्यसमितीच्या बैठकीत 567 कोटींच्या कामांना घाईघाईने प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रशासनाने दाखविलेल्या या चपळाईची आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना सरकार अल्पमतात असताना बैठक घेतलीच कशी, असा सवाल केला. तसेच, नियोजित सर्व कामे थांबविण्याचे तातडीने आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याने नाशिक जिल्हा नियोजन समितीचा गैरकारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जिल्ह्यातील विविध कामांसाठी शासनाकडून जिल्ह्यास ६०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना झालेला असतांना ऑनलाईन बैठक घेत याचे वाटप करण्याचे आदेश काढले होते. मात्र, गेल्या काळात जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मिळत नसल्याबाबत आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना वारंवार लक्ष केले होते. आता पुन्हा एकदा भुजबळ आणि कांदे वाद यामुळे समोर येणार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत मेट्रो-3 लाईन कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री होताच शिंदे यांचे पूर्वसुरी उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीत मेट्रो-3 कारशेड बांधण्याच्या प्रस्तावाला स्थगिती देण्याची घोषणा केली होती.

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...