राजकारण

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिलाच नव्हता; शिंदेंचा खुलासा

Eknath Shinde यांनी सांगितला पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासोबत झालेली चर्चा

Published by : Team Lokshahi

औरंगाबाद : भाजपने (BJP) आधी शिवसेनेला (Shivsena) मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला नव्हता, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज केला आहे. अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) मतदार संघात सिल्लोडमधील सभेत ते आज आज बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, दौऱ्यात रस्त्याने माणसे पाहून मला पंढरपूरच्या गर्दीची आठवण आली. आजची गर्दी गाड्यांमधून भरुन आणलेली लोक नव्हती. प्रेमापोटी आलेली माणसे आहेत, असे म्हणत अप्रत्यक्ष आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर त्यांनी टीका केली. आम्ही निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थितीमध्ये गेली असती हे रामदास कदम यांनी सांगितले आहे.

आपण बाळासाहेब आणि नरेंद मोदी यांचा फोटो लावून निवडणूक लढलो. बरेच जण म्हणाले होते. आम्हाला मार्ग मोकळे आहेत. आम्ही म्हंटलो, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करु. पण, त्यासाठीही इच्छाशक्ती पाहिजे. ते म्हणाले, भाजप नंतर मुख्यमंत्री पद कशावरुन देईल. आपल्याला सुरुवातीला अडीच वर्ष द्यायला पाहिजे. याचा अर्थ आपल्याला भाजपसोबत सत्ता स्थापन करायची नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सुरू असलेल्या हालचाली पाहता आमदारांनी विरोध केला, असे एकनाथ शिंदेंनी म्हंटले आहे.

राज्यात झालेल्या घडामोडी मधून वाटलं की भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील मात्र तेव्हा मला पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री तुम्हाला बनवू शकतो. नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊन पण त्यांना मुख्यमंत्री पद दिले होते. तर, भाजपने शिवसेनेला आधी मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता तर तो कशाला फिरवला असता, असेही शिंदेंनी सांगितले.

अर्जुन खोतकर यांना दबावापोटी आले का हे विचारलं असता ते म्हणाले, मी भावनिक झालो होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला. माझ्यासोबत आलेले कोणताही आमदार ईडीच्या धाकाने आले नाहीत, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला 100, 200 कोटी तर आपल्याला 10 कोटी निधी मिळत होता. राष्ट्रवादीला सोबत घेऊन नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिल्या. वैभव खेडेकर रामदास कदमांच्या विरोधात बोलत असताना त्यांना मदत करा, हे कशाला, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ घेतले तर दुकान बंद करेल, असे बाळासाहेबांचे शब्द होते. मग आम्ही कसे सहन करणार. दहशतवादी हल्ल्याच्या संबंधित नेत्यांच्या संदर्भात बोलता येत नसेल तर कसे हे पटणार, अशी मनातील खंत त्यांनी बोलून दाखवली.

सत्तार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात. मला कुत्रा निशाणी मिळाले तरी मी निवडून येणार. कारण ते वफादार असतात, असे सत्तार म्हणाले होते, असेही शिंदेंनी सांगितले. दरम्यान, याआधी एक फाईल या टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर जायची. आणइ ती फिरत राहायची. परंतु, आता फाईल न घेता थेट फोन उचलायचा डायरेक्ट काम करायचं. आपलं एकच ध्येय एकच अजेंडा राज्याचा विकास, असे त्यांनी म्हंटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी