Eknath Shinde | Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

मोठा गौप्यस्फोट : शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा अटीवर उद्धव ठाकरे युतीस तयार होते...

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप (Maharashtra Politics) सुरु झाल्यानंतर त्याचे धक्के आज दिल्लीत पोहचले. शिवसेनेच्या 12 खासदारांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधत खासदारांची नवीन ओळख करुन दिली. त्यात गटनेते राहुल शेवाळे आणि प्रतोद भावना गवळी असल्याची ओळख करुन दिली. शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात उद्या ओबीसी आरक्षणावर सुनावणी आहे. त्यात राज्याची भूमिका कशी मांडावी, यावर चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच शिवसेना-भाजप युतीचे सरकार लोकहिताचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे गटातील खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष असल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले. यावेळी संजय राऊत यांच्यांवर काहीही बोलण्यास शिंदे यांनी नकार दिला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

सरकारने पेट्रोल- डिझेलवरील कर कमी केला

केंद्र शासनाकडून राज्य सरकारला पाठिंबा

राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरे म्हणाले होते...

राहुल शेवाळे यांनी बोलतांना 2019 मधील उद्धव ठाकरे यांनी बनवलेल्या वचननामाचे वाचन केले. त्यात वचननाम्यात हिंदुत्वापासून राम मंदिरापर्यंत अनेक विषय होते. परंतु मध्यंतरी त्या वचननामाचे पालन झाले नाही. यामुळे आम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय होता. त्याला आम्ही विरोध केला होता. 2024 मध्ये जिंकायचे असेल तर युती करावी, असा सल्ला अनेक खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिला होता.

मोदींसोबत एक तास युतीबाबत चर्चा

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांत 21 जून रोजी दिल्लीत एक तास युती करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी युती करण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच 21 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शिंदे मुख्यमंत्री होणार असेल तर मी युतीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. बैठकीला संजय राऊत, सावंतही उपस्थित होते.

संजय राऊतांनी खोडा घातला

संजय राऊत यांनी युतीत खोडा घातला. वेळोवेळी त्यांनी युती विरोधात निर्णय घेतले. गटनेत बदलण्याची आमची मागणी होती. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली नाही. आजही एनडीएत आहे. आता सर्व 18 खासदारांना भावना गवळी यांचा व्हिप लागू होणार आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी