मुंबई : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक केली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोलीस आयुक्त यांच्याशी मी बोललो आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहेत. पोलीस आपलं काम करत आहेत. मी सगळी माहिती घेतली आहे. थोडासा वादविवाद झाला. शांतता राखली पाहिजे, असे आवाहन एकनाथ शिंदे केले आहे.
रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मुंबा देवीचे दर्शन घेतले. रामनवमीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. मुंबईकरांचं हे कुलदैवत आहे. याचा एकंदरीत विकास झाला पाहिजे त्यांची पाहणी केली. एकत्रित पुनर्विकास करायचा असेल तर अनेक पत्र मला मिळालेले आहेत. सगळ्यांच्या संमतीने या मंदिर परिसराचा विकास करणार आहोत. मुंबई महापालिका नाही तर एक अथॉरिटी द्यावी लागेल. दर्शन रांग, पार्किंग या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सकारात्मक विचार करणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहेय