राजकारण

अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं आहे. राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल, असे शिंदेंनी म्हंटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यामध्ये आज अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या डबल इंजिन सरकारला विकासासाठी साथ दिली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे. कर्तृत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेव्हा अशा घटना घडत असतात, हे आपण आधीही पाहिलं आहे. डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं आहे. राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल, राज्याचा विकास वेगाने होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. तर, अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजत आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती