eknath shinde narendra modi  team lokshahi
राजकारण

शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार, 'या' खासदारांची नावं चर्चेत

Published by : Shubham Tate

eknath shinde : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरणात अनेक रंजक घटना घडताना दिसत आहेत. अनेक घडामोडींनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झाल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच आता, शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांचे समर्थक खासदारांना मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. यासाठी शिंदे गटातून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (eknath shinde minister post in narendra modi government)

दरम्यान, शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील 12 खासदारांपैकी काही खासदारांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे समर्थक खासदारांच्या गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट, राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय पातळीवरील एखाद्या समितीचं अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदारांमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे.

दरम्यान, अडीच वर्षांत पाच वर्षांची कामं करायची आहेत. असं जबाबदारीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार समारंभात केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा नागपुरात जंगी सत्कार करण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात भाजपचा मोठा विस्तार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने