राजकारण

Shivsena : आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही फुटणार? शिंदे गटाच्या बैठकीला 'इतके' खासदार उपस्थित

Published by : Shweta Chavan-Zagade

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेत फुट सुरूच आहे. शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे आमदारांची बैठकी सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार (Shivsena MP) हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी आमदारांपाठोपाठ आता खासदारही फुटत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी आणखीच वाढल्या आहेत.

आजच्या बैठकीत शिंदे गट ठराव मांडून कार्यकारिणीची घोषणा करणार आहे. शिंदे गटाकडून लवकरच प्रमुख नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि ओमराजे निंबाळकर वगळता इतर 14 खासदार या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे आज पक्ष विरोधी कारवाया केल्याने रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. संसदेचं अधिवेशन सुरु झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांतच खासदारांबाबत मोठा निर्णय होतो का हे पाहावं लागेल.

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latur : लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज लातूर बंदची हाक

Bharat Gogawale : आमदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट | Marathi News

Sangli : सांगली जिल्ह्यात पावसाचे थैमान; पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर

Navra Maza Navsacha 2 : "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद