सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. 42 आमदार एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) गुवाहाटीमध्ये आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर लोकशाही न्यूज मराठीने शिंदेंशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आमच्या गुरूस्थानी आहेत. संजय राऊत आणि शिवसेना यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांची आमदारकी रद्द करण्याचे सांगितेल असता यावर बोलताना शिंदे म्हणाले की, त्यांना आमदारकी रद्द करण्याचा, नोटीस देण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
याससोबतच एकनाथ शिंदेंना तुमच्यासोबत आता 42 आमदार आहेत ना असा प्रश्न विचारण्यात आल्यावर सांगितले की, 42 नाही 50 आमदार आमच्यासोबत आहेत. बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. यावेळी लोकशाही न्यूजने त्यांना मुंबईत कधी येणार असा प्रश्न विचारला. त्यावेळी मुंबईत येणार असल्याचे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी सांगितले की, आम्ही मुंबईत लवकरच येणार आहोत. आज आमची बैठक असून बैठकीनंतर आमची पुढील रणनीती ठरवली जाईल. यासर्व पार्श्वभूमीवर भाजपाशी आमची कोणतीही चर्चा झाली नाही आहे. असे एकनाथ शिंदे यांनी LOKशाहीसोबत संवाद साधताना सांगितले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या बैठकीचा अहवाल पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष रमराजे निंबाळकर यांना पाठवण्यात आले आहे. शिवसेनेच्या या नव्या घटक पक्षाच्या अधिकृत पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत.
एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदार की रद्द करावी अशीही मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असता न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.