Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमात ते जाहीर सभांसह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आज पुण्यातील सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते दौऱ्यादरम्यान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde did Vijay Shivtare Deepak Keskar)
अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, वीजय शिवतारेंना कपट कारस्थानाने पाडले. त्यावर मी जास्त बोलणार नाही. पण मला निवडणूक लढवायला कोणत्या चिन्हाची गरज नाही. मी मतदारसंघात काम करून ठेवलय. पण मला इतरांची काळजी आहे. आम्ही हा निर्णय का घेतला याचं ही त्यांनी कारण सांगितलं. माझ्या सहकार्यांना निधी मिळत नव्हता. शिवसैनिकांना जेल मध्ये जावे लागले. सत्तेतीलचं काही पक्षातील पदाधिकारी म्हणायचे आमच्या पक्षात या, तुमचं सरळं प्रकरण मीटवू. हे सगळं मला कार्यकर्ते येऊन सांगायचे. त्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला. तसेच येत्या निवडणूकीत शिवसेनेचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार निवडून आले असते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेची सत्ता असताना शिवसेना चार नंबरवर फेकली गेली. सोबतचा पक्ष सत्तेचा फायदा घेऊ लागला. त्यामुळं हा निर्णय घेतला. धर्मवीर पिक्चर देखील काहींना रुतला. बंडावेळी आम्हांला दीपक केसकरांचा चांगला सहवास मिळाला. त्यांच्यामुळे इतर काम करायला मोकळीकता मिळाली. असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. आणि जे काही केलं ते आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी केलं. ह्या सरकारने सत्तेवर येताचं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला.