राजकारण

2024 मध्ये सर्व रेकॉर्ड पंतप्रधान मोदी तोडून टाकतील; एकनाथ शिंदेंचा विश्वास

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आज रत्नागिरीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रत्नागिरी : 2019 ला सर्वजण पालापाचोळ्यासारखे उडून गेले होते. एकटे पंतप्रधान मोदी सगळ्यांना भारी पडले होते. 2024 मध्ये सर्व रेकॉर्ड मोदीसाहेब तोडून टाकतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आज रत्नागिरीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. तसेच, घरात बसून फेसबूक लाईव्ह करणं सोपं असते. परंतु, आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर जातो, असा जोरदार टोलाही उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

सरकारने केलेल्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आपण उपस्थित आहोत. सर्वसामान्यांचे हिताचे 350 निर्णय घेतले. आमचा अजेंडा सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आहे. आम्ही घरी न बसता लोकांच्या दारी शासन आणण्याचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्यांना कचेरीत खेटे मारणे, चकरा मारणे हे काढून टाकायचं आहे. आजच्या लाभार्थ्यांना 57 लाख रुपये मिळतील. वीस हजारांहून लाभार्थी आज लाभ घेतील. समाजात सरकारबद्दलचं मत आम्हाला बदलून टाकायचं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. यावेळी रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांचंही त्यांनी कौतुक केलं.

आमचं सरकार वेगवान काम करतंय. आम्ही सर्व स्पीडब्रेकर काढून टाकले. आमचं सरकार ऑनलाईन नाही तर डायरेक्ट फिल्डवर आहे. सरकारचं उद्दिष्ट शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवणं आहे. केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. पंतप्रधान मोदी सढळ हस्ते मदत करत आहे. मुंबई-गोवा हायवेबद्दल नितीन गडकरी यांनी लक्ष घातलं आहे. मुंबई-सिंधुदूर्ग ग्रीन फिल्ड रस्ता बनवणार आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त वेळ वाचेल. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन करतोय, असेही त्यांनी सांगितले.

खेटे मारणे थांबवण्यासाठी शासन आपल्या दारी योजना राबवत आहे. गैरसोय, गडबड, गोंधळ नाही. जशी इतर ठिकाणी गडबड सुरू आहे तशी इथे सुरू नाही. यापूर्वीही सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. सर्वांना एकत्र येण्याचा अधिकार आहे. परंतु, 2019 ला सर्वजण पालापाचोळ्यासारखे उडून गेले होते. एकटे मोदी सगळ्यांना भारी पडले होते. पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5 व्या नंबरवर आणली आहे. भारत महासत्तेकडे जातोय, याचीच विरोधकांना पोटदुखी आहे, अशी टीका एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केली आहे. 2024 मध्ये सर्व रेकॉर्ड मोदीसाहेब तोडून टाकतील. एक उमेदवार तर आधी त्यांनी निश्चित करावा. घरात बसून फेसबूक लाईव्ह करणं सोपं असते, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू