राजकारण

वडेट्टीवारांना हात मिळवताना तुमचे चेहरे घाबरले होते; शिंदेंचा विरोधकांना टोला

विजय वडेट्टीवार यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल नार्वेकरांनी अधिकृत घोषणा केली आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन करुन भाषणात जोरदार टोलेबाजी केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधानसभेला आज अखेर विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अधिकृत घोषणा केली आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन करुन भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे.

बेधडकपणा विदर्भातल्या लोकांमध्ये आढळतो. आज विजयभाऊंवर तसा अन्यायच झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नाना पटोले, बाळासाहेब यांनी विरोधी पक्षनेतेपदावर बसवायला हवं होतं. आम्हाला वाटलं अधिवेशन असंच विरोधी पक्षनेत्याशिवाय जातंय की काय, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे. आता आम्ही त्यांना हात मिळवत होतो तर तुमच्या सगळ्यांचे चेहरे घाबरले होते. तुम्ही विजय भाऊंना पकडूनच बसले होते, असे एकनाथ शिंदेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची सरवणकरांसोबत 2 तास चर्चा; सरवणकरांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम

Diwali 2024: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात?