Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारनं 164 सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. (eknath shinde big announcement Devendra Fadnavis)
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्याबाबत ते सांगतील. येत्या 18 तारखेला अधिवेश आणि त्याच दिवशी राष्ट्रपतींची निवडणूक आहे. त्यामुळे त्याही संदर्भात लवकरच निर्णय घेऊ. अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली आहे. तसेच यावर बोलताना एकनाथ शिंदे एकदा सुरू झाले ते पुन्हा सुसाट सुटले. त्यांची फडणवीस आणि केसरकरांना काळजी वाटायला लागली. हे सर्व मी बघत होतो. पण माणसाला कुठेतरी मन मोकळं करावं वाटतं. त्यांनी त्यांचं काम करावं आपण आपलं काम करावं, अशा पद्धतीने लोकशाही जपवण्याचं कामं व्हावं. जर जनतेने ठरवलं तर अनेक बलाढ्य नेत्यांनना सत्तेतून बाहेर बसवतात. अशी बोचरी टीका पवार यांनी केली आहे.
दरम्यान, सर्व लोकांना न्याय देण्याचं काम हे सरकार करेल, लोकांच्या मनातलं हे सरकार आहे. राज्यातले प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याकडे आमचा भर असणार असल्याची माहिती देखील यावेळी शिंदे यांंनी दिली. केंद्र सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. एकंदिरीत केंद्र आणि राज्य एकत्र येतं तेव्हा राज्याचा विकास जलद होत असतो.
खाते वाटपाबाबत आम्ही केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, हे रोज कोर्टात जात आहेत. महाविकास आघाडीत सगळ्यांचा श्वास दाबला गेला होता. तो आता रिकामा झाला आहे. यांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे. त्यावर नियमानुसार कारवाई होणार. शिवसेना ओरिजिनल आम्ही आहोत. अस देखील यावेळी बोलताना शिंदेंनी ठणकावून सांगितले आहे.