state government employees : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरु होणार आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्षावर निशाणा साधला. (eknath shinde announcement state government employees)
पत्रकार परिषदेत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत होते. त्यांची ही मागणी आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
तसेच राज्यात केवळ 46 दिवसांमध्ये लोकांना फरक दिसतोय. सर्वसामान्यांचं सरकार आल्यासारखं वाटतंय. इथेही पाय ठेवायला जागा नाही. नाहीतर मंत्रालय रिकामं होतं, सह्याद्री रिकामं होतं, मंत्र्यांची बंगले रिकामे होते. आता कुठेही पाय ठेवायला जागा नाही, असं चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारने नऊ-नऊ महिने मदत केली नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.