Banner Team Lokshahi
राजकारण

कोणता झेंडा घेऊ हाती? शिवसेना कार्यकर्त्यांनी साधला मधला मार्ग

Published by : Team Lokshahi

अमजद खान| कल्याण

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच कल्याण डोंबिवली त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहे. बॅनर लावणारे शिवसैनिक आहे. यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती? हा प्रश्न सोडवत मातोश्री आमचे प्रतिपंढरपूर, एकनाथ शिंदे आमचे नेते म्हणत बॅनरवर दोन्ही नेत्यांचे फोटो लावले आहेत.

शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनीही बॅनर लावला आहे. त्यांच्या बॅनरवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले आहे. याविषयी उगले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मातोश्री हे आमचे प्रतिपंढरपूर आहे. तसेच मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत .दोन्ही नेते शिवसेनेचे असल्याने ते आम्हाला दैवताप्रमाणो आहे. असे कोणी म्हटलेले नाही की यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे फोटो बॅनरवर असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ शिंदे यांची सूरतवारी त्यानंतर गुहाटीचा हॉटेल मुक्काम त्यानंतर त्यांचे मुंबईत येणो. मुख्यमंत्री पदाची शपथ घेत मुख्यमंत्री पदी विराजमान होते. दरम्यानच्या काळात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शिवसैनिकात संभ्रमाचे वातावरण होते. शिंदे यांचा ठाणे जिल्ह्यात दबदबा राहिला आहे. आत्ता तर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शहरातील शिवसैनिकांनी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनवर शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचाही फोटो आहे. दोन्ही नेते शिवसैनिकांना समान आहे. हे चित्र शहरात दिसून येत आहेत

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल