Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

बडोद्यात मध्यरात्री शिंदे-फडणवीसांत खलबते; अमित शहांची उपस्थिती, काय घडले त्या रात्रीत ?

Published by : Team Lokshahi

Maharashtra Political Crisis : शिवसेनेशी बंड करणारी शिंदेसेना एकीकडे आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी रणनीती आखत आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत येण्याच्याही हालचाली करत आहे. पण सत्तावाटपाच्या ‘वाटाघाटी’ निष्कर्षापर्यंत येत नसल्याने फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये बडोद्यात शुक्रवारी मध्यरात्री खलबते झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, केवडिया येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील रात्रीच बडोद्याला गेले. बैठकीत त्यांच्याही सहभागाची चर्चा होती, त्याला दुजोरा मिळाला नाही.

शुक्रवारी रात्री १०.३० वाजता अमित शहांचे विमान बडोदा विमानतळावर उतरले. केविडया येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने शहा गुजरातेत आले. मात्र अहमदाबादेत न उतरता ते बडोद्यात उतरले. देवेंद्र फडणवीस रात्री १० वाजता मुंबईहून विशेष विमानाने निघाले. इंदूरमार्गे ते बडोद्याला गेले. हे विमान उतरल्याची विमानतळावर नोंद आहे. गुवाहाटीहूनही विमान बडोद्यात आल्याची नोंद आहे. याचा अर्थ शिंदेही तिथे आले व या तिघांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली. बडोद्याच्या विमानतळावर रात्री १२ नंतर एकही विमान येत नाही. मात्र शुक्रवारी रात्री १०.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत चार विशेष विमाने उतरल्याची नोंद आहे. त्यामुळे वरील शक्यतांना पुष्टी मिळते.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला हे तुमच्याकडून कळतंय. मी प्रवाशात व्यस्त आहे. टीव्ही पाहण्याचाही वेळ मला मिळाला नाही.

निर्णायक घडामोडींना उद्यापासून वेग शक्य

फॉर्म्युला अंतिम झाला असेल तर सोमवारपासून हालचालींना वेग येईल. एक-दोन दिवसात शिंदे आघाडी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र राज्यपालांना देतील. त्यानंतर राज्यपाल फ्लोअर टेस्टचे आदेश देतील. मग शिंदेसेना मुंबईत येऊन मतदान करेल.

१२ पेक्षा जास्त मंत्रिपदांसाठी शिंदेसेना आग्रही

मंत्रिपदे वाढवण्यासाठी शिंदे आग्रही आहेत, मात्र ती पूर्ण करणे फडणवीसांच्या हाती नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील वाटाघाटी व अंतिम शब्द घेण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्याची ‘मध्यस्थी’ गरजेची होती. म्हणून या नेत्याने बडोद्यात शिंदेंसोबत ‘अंतिम करार’ केल्याची माहिती आहे.

  • शिंदे सेनेकडे सध्याच ९ मंत्री आहेत. इतक्या मोठ्या बंडानंतरही दोन-तीनच मंत्रिपदे वाढत असतील तर ‘परवडणारे’ नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

  • शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद व त्यांच्या समर्थक १० ते १२ आमदारांना मंत्रिपदे असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मात्र यात शिंदेसेना समाधानी नसल्याचे कळते.

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले