महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. शिंदे मंत्रिमंडळात 30 जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी होता. परंतु मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी 4 वाजताच दिल्लीत पोहोचले. त्यानंतर त्यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली.
हे आहे सूत्र
भाजपचे 22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, तर शिंदे गटाला 4 आमदारांमागे एक मंत्रिपद या सूत्राने 13 मंत्रिपदे देण्यात येतील. त्यात कॅबिनेट, राज्यमंत्रिपदे आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 22 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे विस्तार झाला नव्हता.
अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अधिवेशनच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल'. राज्य सरकारचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार करण्यात येणार आहे. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी भेट घेतली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली.