लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून कसून तयारी केली जात आहे. पुणे लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसकडून चर्चा सुरु झाली आहे. उमेदवार मराठा द्यावा की ओबीसी यावरुनही चर्चा सुरु झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसमध्ये अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. रवींद्र धंगेकर यांच्याकडून सोशल मीडियावर प्रचारही सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
आता लोकसभा निवडणुकीसाठी तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच लक्ष लागले आहे.