विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी रोहित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघे एकाच वेळी अधिवेशनाला पोहोचले. रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. त्यानंतर आज रोहित पवार यांनी हटके टी-शर्ट परिधान केले आहे.
त्यांच्या या टी-शर्टची चर्चा रंगली आहे. मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिण्यात आलंय. तर “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्दयाचं बोलूया! असं देखिल या टी-शर्टवर लिहिण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील MIDC सह सर्वच युवांसाठी महत्त्वाचा असलेला रोजगाराचा विषय अधिवेशनात लावून धरल्याने मतदारसंघाबाहेरच्या एका मित्राने हा टी-शर्ट भेट दिला. शिवाय
‘ध्येय विकासाचं ठेवूया
वेध भविष्याचा घेऊया
युवाशक्तीला संधी देऊया
आणि फक्त मुद्द्याचं बोलूया!
हा मनातला निश्चियही त्या टी-शर्टवर रेखाटत युवांच्या मुख्य प्रश्नांवरून ढळायचं नाही, हा मेसेज देण्याची त्याची कल्पना आवडल्याने आज हा टी-शर्ट घालूनच विधानभवनात प्रवेश केला. असं त्यांनी ट्विट केला आहे.