मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यात पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवरुनही मुंडेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अजून पंचनामे झाले नाहीत. पावसाचा सर्वात जास्त फटका विदर्भ, मराठवाड्याला बसला आहे. एकतर मंत्रिमंडळ विस्तार उशीर केला. त्यातही पालकमंत्री उशिरा नेमले. मागील वर्षीही अशी परिस्थिती झाली होती. आम्ही मदत केली. पण, आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही. तर स्वतःच्या हितासाठी आले आहे. राज्यात एवढं पीक नुकसान झालं आहे. मात्र, कृषिमंत्री काय कुठलेच मंत्री दिसत नाहीत, असे टीकस्त्र त्यांनी शिंदे सरकारवर डागले आहे.
पंकजा मुंडेंची यांच्या मंत्रिमंडळातील वर्णीबाबत धनंजय मुंडेंना म्हणाले, मंत्रिमंडळ दुसरी यादी जाहीर होणार आहे. यावर बोलतात पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का विचारायला हवं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तर, दिवाळीनिमित्त शिंदे सरकार गोरगरीबांना शिधा वाटप करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप शिधा वाटप झाले नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी निमित्त सामान्य नागरिकांना शिधा भेटणार नाहीच. नुसत्या गोड घोषणा सरकार करत आहे, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.