राजकारण

नेमके हवेत कोण? हे त्यांनीच तपासावे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सत्ता हाती असेल तर पाय जमिनीवर असले पाहिजे, असं म्हणतं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली होती. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. नेमके हवेत कोण आहे हे त्यांनी तपासले पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमके हवेत कोण आहे हे त्यांनी तपासले पाहिजे, असे प्रत्युत्तर त्यांनी शरद पवारांना दिले आहे. तसेच, सामना हा आता पेपर नाही, मी तो वाचत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सीमा वादावर आमच सरकार फार गंभीर आहे, हरीष साळवेंशी आम्ही संपर्क साधत आहोत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगजेबास ‘माननीय’ किंवा ‘औरंगजेबजी’ ठरवण्यामागे भाजप नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे ‘पिताश्री’ गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला असावा, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम