नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांचे महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये, सीमाप्रश्नी याविरोधात महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला होता. यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका करत मोर्चाला नॅनो मोर्चा म्हंटले होते. याला उध्दव ठाकरे यांनी आज प्रत्युतर दिले आहे. फडणवीस साईज आमचा मोर्चा होता, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले आहे. ते नागपूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, १७ तारखेच्या मोर्चात सीमाप्रश्न मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या म्हणून आज गप्प बसावे असे नाही. पण, आजही तिथे मराठी नागरिकांवर अत्याचार होत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अद्यापही पत्र लिहून विचारतात काय करु? त्यांनी स्वतः रामराम घेणे गरजेचे होते, असेही त्यांनी म्हंटले आहे. फडणवीस साईज आमचा मोर्चा होता, अस माझ उत्तर आहे. नॅनो मोर्चा संबोधलेल्यांची बुध्दी नॅनो आहे, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
मोर्चानंतर आता बंदची सुरुवात झाली आहे. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आमच्यावर हक्क सांगताहेत. सावित्रीबाई फुलेंवर राज्यपाल बोलले तो नॅरेटीव्ह आम्ही नाही सेट केला. आमची लढाई ही त्यांच्या नरॅटीव्ह विरोधात. यांचा महाराष्ट्र द्वेष कमी होत नाहीए. आम्ही त्यांना ताळ्यावर आणू, असा इशाराही उध्दव ठाकरेंनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांची क्लिप आई वडिलांना शिव्या दिला तर चालेल. हे ऐकले असते तर प्रबोधनकारांनी सणकण कानाखाली दिली असती. प्रबोधनकार वाचले ते चंद्रकांत पाटलांचे भाग्य आहे, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट म्हणून दिले. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दात काही चूक नाही हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटल यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक दाखवले. एखाद्या कारणासाठी निधी गोळा करणे म्हणजे भीक मागण्यासारखे आहे, असा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला.