Devendra Fadnavis | Aditya Thackeray team lokshahi
राजकारण

सगळा अभ्यास आदित्य ठाकरेंनीच केलाय असे नाही; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

तुमच्या काळात नदी काठी अनधिकृत बांधकामे कशी झाली, फडणवीसांचा टोला

Published by : Shubham Tate

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या हितासाठी नाही, तर केवळ इगोपोटी मेट्रो कारशेड कांजुरला नेण्याचा निर्णय घेतला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. तर आदित्य ठाकरे हे जरुर पर्यावरण मंत्री राहिले असतील, पण सगळा अभ्यास त्यांनीच केलाय असा अर्थ होत नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. (Devendra Fadnavis targets Aditya Thackeray)

फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. जी झाडे कापली आहेत. ती झाडे त्यांच्या आयुष्यात जेवढं कार्बन तयार करतील तेवढं मेट्रो 80 दिवसात करेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. ही मेट्रो एक एक दिवस लेट करणं म्हणजे मुंबईकरांचं प्रदूषणाच्या माध्यमातून आयुष्य कमी करणं आहे. त्या ठिकाणी काम सुरू झालं. 25 टक्के काम झाल्यावर आंदोलन झालं. त्यामुळे काम बंद झालं. पर्यावरणवाद्यांचा आदर करतो. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते आंदोलन करत असेल तर त्यामागे त्यांचा सदहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. मुंबईकरांच्या जीवनातील प्रवास सुकर होणार आहे. तसेच 17 लाख लोक प्रवास करणार आहेत.

दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यासारखे सण निर्बंधमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मेट्रो कारशेडवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन उत्तर देतो, असं म्हणत फडणवीसांनी आपला मुद्दा मांडला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

यापूर्वी याच संस्थांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन केलं होतं. ते हायकोर्टात गेले, मात्र न्यायालयाने या संस्थेच्या विरोधात निकाल दिला. पुढे ते राष्ट्रीय हरित लवादाकडे गेले, त्यांनीही संस्थेच्या विरोधात निकाल दिला, मग ते सुप्रीम कोर्टात गेले. मेट्रोमुळे दोन लाख मेट्रिक टन किंवा कमी-अधिक कार्बन उत्सर्जन आपण थांबवणार आहोत. मेट्रोला आपण एक एक दिवस उशीर करणं म्हणजे एक-एका मुंबईकराचं आयुष्य प्रदूषणाच्या माध्यमातून कमी करणं, असा अर्थ असल्याचं फडणवीस म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी