राजकारण

पुण्यात भाजपने बालेकिल्ला गमावला! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

devendra fadnavis reply on pune by election

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. कसब्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. तर, चिचंवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या वाटोवर आहेत. यावर विरोधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. थोडे आम्ही तर थोडे तुम्ही आत्मचिंतन करा, असे त्यांनी म्हंटले आहे.

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा 73 हजार 194 मतांनी विजय झाला. तर, हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप 71 हजार 799 हजार मते मिळवत आघाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 61 हजार 540 मते व राहुल कलाटे यांना 23 हजार 255 मते मिळाली आहेत.

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कसबा आणि चिंचवडचा निकाल स्वीकारला पहिजे. कसब्याचे काही आत्मचिंतन आम्ही करू. चिंचवडचे तुम्ही करा. यांसह तीन राज्यांचाही निकाल समोर आला आहे. यात काँग्रेस कुठे दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकांची मतमोजणी आज पार पडत आहे. त्रिपुरामध्ये भाजप आणि नागालँडमध्ये एनडीपीपी (भाजप युती) सत्तेवर येणे जवळपास निश्चित दिसते. दुसरीकडे मेघालयात त्रिशंकू सरकार स्थापन होत आहे.

हर्षवर्धन पाटील कुटुंबीय पहिल्यांदाच पाडव्यानिमित्त गोविंद बागेत जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' तारखेला सोलापूर दौऱ्यावर येणार

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात पाडव्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट

यंदा बारामतीत पवार कुटुंबियांचे दोन दिवाळी पाडवे

Diwali Padwa, Bali Pratipada 2024 Wishes: आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा आपल्या प्रियजनांना द्या दिवाळी पाडव्याच्या आणि बलिप्रतिपदेच्या "या" शुभेच्छा...