राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकली. मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून दीड महिन्यात तीन वेळा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे या छापेमारीनंतर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते भाजपा आणि किरीट सोमय्यांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच छापेमारीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगेलच तापले आहे. यावरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत असताना याच कारवाईवर आता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. अहमदनगरमध्ये देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा त्यांना हसन मुश्रीफ यांच्या घरी पडलेल्या धाडीबाबत त्यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, “मला त्याची कोणतीही कल्पना नाही. माध्यमांवरच त्याबद्दल पाहिलं,” असे ते यावेळी म्हणाले.