जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे.
गेल्या 10 वर्षांपासून हरियाणात भाजपाची सत्ता असून भाजपने हरियाणात तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल काँग्रेस असेल, पवार साहेबांचा गट असेल किंवा उबाठा असेल हे सगळं पूर्ण शस्त्र त्याठिकाणी चमकवून बसले होते की, कुठे हरियाणामध्ये भाजप हरतो आणि आम्ही भाजपवर हल्ला करतो. पण काल ती संधी त्यांना मिळाली नाही.
देशाचा मूड काय आहे हा आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित आहोत म्हणणारे हम सब साथ साथ है म्हणणारे आज आता हम तुम्हारे है कोन असे म्हणायला लागले. हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. या निवडणुकीने एक स्पष्ट करुन दाखवलं फेक नरेटिव्ह हा ब्रेक झाला आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि तो फेक नरेटिव्ह संपलेला आहे आणि लोक भाजपच्या पाठिशी आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.