राजकारण

शरद पवारांनी बेईमानी केली असं...; फडणवीसांचे प्रत्युत्तर

शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उत्तर दिले होते. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील, असा टोला शरद पवारांनी लगावला होता. यावर फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला आलो होतो हे महत्त्वाचे नाही. यावर इतिहास ठरत नसतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले ते खरे आहे की १९७७ साली मी प्राथमिक शाळेत होतो. पण, काल मी जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले तरी ते त्यांना अस्वस्थ करणारे होते म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. १९७८ साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते, त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले ४० लोक त्यांनी बाहेर काढले आणि त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं.

आता एकनाथ शिंदे तर भाजपसोबतच निवडून आले होते. शिंदे ५० लोक घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार स्थापन केलं. म्हणजे पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्येगिरी आणि एकनाथराव यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कशी असू शकते, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

मी कुठेही पवार साहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. उलट मीच म्हटलं भाजपासोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. उलट माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही आहेत. एक गोष्ट पवार साहेबांनी केली तर ती मुस्तद्देगिरी ठरते. तर तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांनी केली, उलट ती तर मेरिटची केस आहे. कारण एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत युतीत निवडून आले आहेत. उलट ते तर काँग्रेस सोबत निवडून आले होते आणि नंतर भाजप सोबत सरकार स्थापन केलं होते.

माझं म्हणणं एवढेच आहे, मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला आलो होतो हे महत्त्वाचे नाही. कुणी जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलेलं आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात ४० लोकांनी वसंतदादांचं सरकार पाडलं. ते बाहेर पडले व भाजप म्हणजे तेव्हाचा जनसंघ सोबत सरकार स्थापन केलं. तेच मी सांगितले आहे, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी