मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. यामुळे शेतपिकांना मोठा फटका बसला असून नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करतो. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेतील जागावाटपाचा महायुतीचं फॉर्म्युला ठरला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल मी यावर अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे. आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहे. फॉर्म्युला चर्चानंतरच ठरेल. पण बेसिक काय असेल जो ज्या सीट लढल्या आहे त्या सीट त्याच्याकडे जाव्या, असा त्याचा बेसिक असणार आहे. त्याचा अर्थ स्टॅटिक आहे का असं नाही. त्यात आवश्यक बदल देखील आम्ही बसून करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.