राजकारण

छत्रपती संभाजीनगरमधील अपघाताबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. यावर राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिली असून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान, वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर भीषण अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रॅव्हलर बस धडकल्याचे समोर आले आहे. ट्रॅव्हलरमध्ये सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे सगळे लोक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. मृत्यू झालेल्यामध्ये चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा