मुंबई : भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपच्या एकूण वाटचालीवर प्रकाश टाकला. सत्तेसाठी आपण जन्माला आलो नाही, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, जागतिक नेता म्हणून पंतप्रधान मोदींना मानतात. तर भारतात गरिबांचा मसीहा म्हणून बोलतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. पहिल्यांदा जनसंघाच्या रुपाने पन्नाशीच्या दशकात स्थापन झाली. आणीबाणी व अराजकतेविरोधात एक लढा जनसंघाने लढला. हा लढा लढताना अराजकताना पसरवताना काँग्रेसला दूर करण्यासाठी जनसंघ हा जनता पार्टीत विलीन झाला. दिवंगत इंदिरा गांधी यांची जुलमी राजवट दूर केली. कम्युनिस्टांनी वाद निर्माण केला, तो पक्ष फुटला. जनसंघातून भाजपाचा जन्म झाला.
पहिले अधिवेशन झाले. त्यात आपले नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पश्चिम तटेवरच्या साक्षी ठेवून सांगितले होते अंधेरा छटेगा, कमल खिलेगा. तेव्हा कुणाला विश्वास नव्हता. पण, इंदिरा गांधी यांची हत्या झाली राजीव गांधी लाटेत निवडून आले. तेव्हाही भाजपाचे २ खासदार आले. आम्हाला पर्याय म्हणतात कोण ज्यांचे दोन निवडून आले. त्यानंतर ६ वर्षे भाजपाचे सरकार आले. त्यानंतर पुन्हा १० वर्षे काँग्रेस सरकार पाहिले. नंतर नव भारताचे नव सरकार मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाहिले, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी देशात परिवर्तन घडवतेय. आज जागतिक नेता म्हणून मोदींना मानतात. तर भारतात गरिबांचा मसीहा म्हणून बोलतात. गरिबाला घर, पाणी, वीज, अन्नधान्य मिळत आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी, युवकांना रोजगार मिळतोय. सर्वात मोठा पक्ष आपण झालो. कारण जनसेवा हे आपले ब्रीदवाक्य आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप अस्तित्वात आला. भविष्यातील आशेचा किरण म्हणजे भारत, असे जग म्हणतेय.
सत्तेसाठी आपण जन्माला आलो नाही. सत्ता ते सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे. समाजात मोठे परिवर्तन करण्याचे काम आपण करतोय. भाजप आज देशाच्या सर्व भागात जनतेचा पक्ष म्हणून काम करताना दिसतोय. आज उत्तर, पूर्व भागातही भाजप सरकार स्थापन करत आहे. हा विश्वास का तयार झाला? एक नेता घर संसार सोडून २४ तास देशाचा विचार करतोय. एकालाही गोविंद काळातही भुकेने मरून देत नाही. म्हणून हा विश्वास तयार झाला आहे, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.