विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषणस्थळी जालना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यावरुन वातावरण चांगलेच तापले होते. अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांकडून लेखी उत्तर दिले आहे.
अंतरवाली सराटीत दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी त्यांनी 24 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. सर्व गोष्टींची माहिती घेऊनच गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल.
तसेच पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने बाळाचा वापर केला. यात 50 आंदोलक जखमी झाले असून 79 पोलीस जखमी झाले. यात पोलिस जास्त जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनातून समजते. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि त्यांच्यावरील कारवाईची माहिती दिली. लेखी उत्तरामध्ये त्या दिवशी जे घडलं त्याचा तपशील दिला आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.