नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपने पाचपैकी चार राज्यांमध्ये सत्ता मिळवल्याचे चित्र पाहायला मिळालं. दरम्यान भाजपने गोव्यामध्ये असलेली सत्ता राखली आहे. पण गोव्यात सत्ता मिळविल्यानंतर भाजपची चिंता आणि डोकेदुखी वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे, गोव्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक उमेदवार खूप आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाची धूरा आता नेमकी कोणाकडे सोपवावी हा प्रश्न भापजसमोर व पर्यायाने देवेंद्र फडणवीसींसमोर उभा आहे.
मुख्यमंत्रीपद नोमकं कोणाकडे द्यायचं ह्याचा निर्णय आज सायंकाळी घेतला जाण्याची शक्यता आहे. गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजित राणे, रवी नाईक, गोविंद गावडे हेही इच्छूक आहेत. आज संध्याकाळी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. ह्या बैठकीदरम्यान आज गोव्यातील मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित होणार अशी शक्यता वर्तवली जातेय. गोवा निवडणूकीवेळी प्रचाराची सूत्र सांभाळलेले फडणवीस ह्या बैठकीला गोव्याचे प्रभारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.