uddhav thackeray Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

Devendra Fadnavis : लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...

देवेंद्र फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना नेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा झाली. या सभेत बहुर्चित औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावर गुगलीच टाकली. तसेच, भाजपच्या (BJP) जल आक्रोश मोर्चावरही त्यांनी टीका केली. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उध्दव ठाकरेंवर ट्विटरद्वारे टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना. काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे! बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि..., अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

तसेच, माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार, असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना विचारले आहेत.

काय म्हणाले उध्दव ठाकरे नामांतराबाबत?

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, संभाजीनगरचे नामकरण कधीही करु शकतो. परंतु त्यापुर्वी या शहराचा विकास करायचा आहे. हा विकास संभाजी राजेंना अभिमान वाटावा, असा करायचा आहे. यामुळे शहरात विकासाची कामे सुरु आहे. परंतु, नामकरणाचा पहिला टप्पा म्हणून औरंगाबाद विमानतळाचे नामकरण संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. परंतु, हा प्रस्ताव अजून मंजूर झाली नाही. भाजप शहराचा नामकरणावर राजकारण करत आहे, त्याऐवजी त्यांनी विमानतळाचे नामकरण करण्यात यावे.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news